सरकारवर टीका केल्यानंतर राहुल बजाज यांच्यावर भाजप मंत्र्यांची आगपाखड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारवर टीका करण्यास लोक घाबरतात असे उद्योजक राहुल बजाज यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सुनावले होते. त्याविरोधात आता भाजप मंत्र्यांनी राहुल बजाज यांच्यावर आगपाखड केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण, हरदीप सिंह पुरी आणि पियुष गोयल यांनी बजाज यांनी टीका केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, राहुल बजाज यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अमित शहा यांनी दिली. प्रश्न आणि टीकेचे उत्तर दिले जाते. प्रश्नाचे उत्तर मागणे हा योग्य मार्ग आहे परंतु आपण मत आपले सांगणार आणि ते सगळीकडे पसरवणे चुकी आहे. जर या गोष्टीला जास्त महत्त्व मिळाले तर राष्ट्रहिताला बाधा येऊ शकते असे सीतारमण म्हणाल्या आहेत.

पियुष गोयल यांनीही अमित शहांचेच उत्तर बजाज यांना दिले आहे. शहा म्हणाले होते की तुमचा प्रश्न ऐकल्यानंतर लोकांना वाटणार नाही की देशात भितीचे वातावरण आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनीही ट्विटरव म्हटले की, जगात असे अनेक समाज आहे ज्यांना घाबरवून त्यांच्यावर राज्य केले जाते. परंतु अशा समाजात जिथे खोट्या गोष्टी पसरवून जे सरकारवर टीका करतात तेव्हा देशात भितीचे वातावरण आहे असे म्हणने चुकीचे आहे.