फाशी म्हटल्यावर निर्भयाच्या आरोपीला आठवले गांधी, धर्म आणि प्रदूषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मरता क्या नही करता अशी हिंदीत म्हण आहे. म्हणून निर्भया प्रकरणातील आरोपीला गांधींचे विचार, धर्मातील तत्व आणि दिल्लीतील प्रदूषण आठवले आहे. दिल्लीत असेही प्रदूषण आहे  जिथे माणूस दररोज मरतो तर मला फाशीची शिक्षा देण्याची गरजच काय असा प्रतिवाद आरोपीने केला आहे.

निर्भया प्रकरणातील आरोपी अक्षय कुमारने याचिका दाखल केली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, “दिलीत हवा आणि पाण्याची स्थिती सगळ्यांना माहित आहे. दिल्लीची अवस्था गॅस चेंबर सारखी झाली आहे. दिल्लीचे पाणीही विषारी झालेले आहे. अशा वातावरणात आयुष्य छोटे होऊन जातं. मग फाशीच्या शिक्षेची गरज काय असा सवाल अक्षय कुमारने विचारला आहे.

अक्षयने याचिकेत महात्मा गांधींच्या अहिंसेचा हवाला दिला आहे. तसेच वेद पुराण उपनिषदांचाही संदर्भ दिला आहे. याचिकेत अक्षयने म्हटले की सतयुगम्ध्ये लोक हजारो वर्ष जगत होते. त्रेतायुग मध्येही लोकांचे आयुष हे हजार वर्ष इतके होते. परंतु कलयुगात मनुष्याचे सरासरी वय हे ५०-६० वर्षे झाले आहे. खूप कमी लोक असतात जे ८०-९० वर्षे जगतात. अनेक अवहेलना सहन करत एक मनुष्य जिवंतपणीच मृत होऊन जातो आणी फार काळ नाही जगत असे तत्वज्ञानही त्याने याचिकेत सांगितले आहे.

निर्भया प्रकरणात चार आरोपींपैकी तिघांनी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. परंतु त्यातील चौथा आरोपी अक्षय कुमारने दया याचिका दाखल केली नव्हती.