
जिंतूर तालुक्यातील चारठाणा 33 के.व्ही.चा पुरवठा करणारी मुख्य वाहिनीला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. यामुळे परिसरातील 6-8 तास विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. यामुळे वेळेवर बिल भरूनही नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
जिंतुर तालुक्यातील चारठाणा हे सर्वात मोठे गाव आहे. महावितरण कंपनीचे 33 के.व्ही. सबस्टेशन असून जिंतुर येथून विद्युतपुरवठा केला जातो. ही मुख्य विद्युत तारा खूप जीर्ण झाल्या आहेत. यामुळे या तारा कधीही अचानक तुटून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याकडे सर्रास दुर्लक्ष करत इंजिनिअर व लाईनमेन यांना माहिती असूनही हे फक्त वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित आहेत. या शिवाय चारठाणा येथील गावातही हीच परिस्थिती झाली आहे.
ग्रामस्थांना रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. नागरिक जीव मुठीत घेऊन चालत असून त्यांच्या मनात अपघाताची भीती निर्माण झाली आहे. तुटली की महावितरण कंपनीचे अधिकारा-कर्मचारी 6 ते 8 तास विद्युत पुरवठा खंडीत करत आहेत. यामुळे येथील ग्राहकांना अंधारात चाचपडत राहावे लागल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकारी व वरिष्ठ, स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, सरपंच यांनी येथील महावितरण या समस्येकडे लक्ष अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.



























































