
कार उत्पादक कंपनी Porsche 2020 मध्ये हिंदुस्थानात आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या कारचे नाव Porsche Taycan असे ठेवले आहे. या कारच खास वैशिष्ठ म्हणजे, ही कार चार मिनिट चार्ज केल्यानंतर 100 किमीपर्यंत धावू शकते.

Taycan च्या लाँचिंगनंतर Porsche हिंदुस्थानात इलेक्ट्रिक कार आणणार्या कंपन्यांच्या यादीत सामील होणार आहे. कंपनी ही इलेक्ट्रिक कार CBU (संपूर्ण बिल्ट युनिट) म्हणून हिंदुस्थानात आयात करेल. 2020 च्या अखेरपर्यंत ही कार हिंदुस्थानात लॉन्च करण्यात येणार आहे. ही कार 800 व्होल्टच्या आर्किटेक्चरवर तयार करण्यात आली आहे. म्हणजे फक्त 4 मिनिटांच्या चार्जिंगनंतर ही कार 100 किलोमीटर धावेल, असा कंपनीने दावा केला आहे. तसेच संपूर्ण चार्ज केल्यावर ही कार 500 किमी अंतर धावू शकते.

या कारच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही आहे.
























































