
कोल्हापूरच्या हुपरी शहराची नळपाणी योजना रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. गेल्या पंधरा वर्षांत केवळ 60 टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्याची दखल घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कोल्हापूर येथील अभियंत्यांची भेट घेऊन जाब विचारला.यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, तालुका संघटिका उषा चौगुले, उपविभागप्रमुख विनायक विभूते, शहरप्रमुख अमोल देशपांडे, मीना जाधव, पक्षप्रतोद बाळासो मुधाळे, नगरसेविका पूनम पाटील उपस्थित होते.





























































