टीम इंडियाने बाकावर बसवलं, पण पठ्ठ्याने मैदानात उतरताच खणखणीत शतक झळकावलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेश आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळूनही यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला बाकावर बसून राहावे लागले होते. एकाही लढतीत त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेमध्ये ऋषभ पंत याची कामगिरी यथातथाच राहिली होती. त्यामुळे पंतच्या जागी संघात स्थान मिळालेल्या संजू सॅमसनला अंतिम 11 मध्ये खेळवण्याची मागणी करण्यात आली. मात्र संघात निवड होऊनही त्याला बाकावर बसावे लागले.

विंडीजविरुद्धच्या मालिकेआधी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही संजू सॅमसनला बाकावर बसवून ठेवण्यात आले होते. तसेच एक दिवसीय मालिकेसाठी त्याची निवडही करण्यात आली नाही. त्यामुळे रणजी स्पर्धेकडे मोर्चा वळवलेल्या संजू याने पहिल्याच लढतीत खणखणीत शतक ठोकले आहे.


View this post on Instagram

MUMBAI…..

A post shared by Sanju Samson (@imsanjusamson) on

केरळ आणि बंगाल यांच्यात रणजी स्पर्धेच्या लढतीला मंगळवारपासून सुरू झाला. या लढतीत केरळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केरळची सुरुवात खराब झाली आणि त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. यानंतर मैदानावर आलेल्या संजू सॅमसन याने डाव सावरला. या दरम्यान, संजू सॅमसन याने शतकी खेळी केली. संजूने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 10 वे शकत झळकावले आणि 3000 धावाही पूर्ण केल्या. संजू सॅमसन 161 चेंडूत 14 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 102 धावा करून मैदानावर शड्डू ठोकून आहे.