
पारनेर तालुक्यातील अत्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत अनेकर यांनी आरोपीस 20 वर्ष सक्तमजुरी व 1 लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मनोज हरीहर शुक्ला असे त्या नराधमाचे नाव आहे.
पिडीत मुलीचे आईवडील हे नेपाळ मधील रहिवासी असून रोजगाराच्या निमित्ताने पारनेर या ठिकाणी आले होते. पिडीत मुलीचे आईवडील हे हॉटेल यशवंत मध्ये आचारी म्हणून काम करीत होते व भरत नामदेव पठारे (रा.पारनेर) यांच्या मळ्यातील खोलीमध्ये ते मुलीसह राहत होते. ती जिल्हा शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होती. 5 मे 2017 रोजी रात्री 10.30 वा पिडीत मुलीची आई घरात काम करत असतांना पिडीत मुलगी ही घराबाहेर बसलेली होती. त्यावेळी त्यांच्या शेजारच्या चाळीत राहणारा मनोज हरिहर शुक्ला पिडीतेस चॉकलेट देतो असे सांगुन तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला व तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. मुलीच्या आई काम आटोपल्यानंतर बाहेर आल्यानंतर तिला तिची मुलगी दिसली नाही. म्हणुन तिने तिचो शोधाशोध केली असता तिला तिची मुलगी आरोपीच्या घरामध्ये सापडली. त्यावेळी आरोपीने घरास आतुन कडी लावुन घेतली होती. मुलीच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते. त्यानंतर तिच्या आईने तिच्याकडे विचारपुस केलो असता, मुलीने आरोपीने केलेल्या कृत्याबाबतची माहिती तिच्या आईला सांगितली. त्यांनतर पिडीतेच्या आईने आरोपी विरुद्ध पारनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. सदरच्या फियांदीवरुन आरोपीस सदर प्रकरणी त्याच दिवशी अटक करण्यात आले.
या गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक आर.डी.पवार यांनी करुन न्यायालयात आरोपी विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत एल.आनेकर यांच्या समोर झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यामध्ये पिडीत मुलीची साक्ष व वैद्यकिय अहवाल या बाबी महत्वपुर्ण ठरल्या. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीस वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.
























































