शत्रुचे तळ भेदू शकणाऱ्या ‘पिनाक’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानकडे असलेल्या अनेक भेदक शस्त्रास्त्रांमध्ये आता ‘पिनाक’ या नवीन क्षेपणास्त्र यंत्रणेची भर पडली आहे. संपूर्ण देशी बनावटीच्या पिनाक या क्षेपणास्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.

डीआरडीओतर्फे गुरुवारी ओडिशाच्या किनारी भागातील चांदीपूर येथे पिनाकची चाचणी घेण्यात आली. पिनाक ही संपूर्ण देशी बनावटीची अद्ययावत क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. 90 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारी ही यंत्रणा 44 सेकंदांमध्ये तब्बल 12 क्षेपणास्त्रांचा मारा करून शत्रुला संपूर्णतः उद्ध्वस्त करू शकते. शत्रुचे तळ शोधून काढण्यासाठी पिनाकला नौदलाच्या उपग्रह प्रणालीशीही जोडण्यात आलं आहे. त्यामुळे शत्रुचा तळ शोधून तो नष्ट करणं अधिक सोपं होणार आहे.