अबब..! गुगलने सुंदर पिचाईंना दिले ‘न भूतो’ पॅकेज, आकडा वाचून थक्क व्हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी-अमेरिकन वंशाचे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांच्यावर याच महिन्यात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. गुगलचीच मूळ कंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची जबाबदारीही आता सुंदर पिचई पाहणार आहेत. यासाठी सुंदर पिचाई यांना भरभक्कम पॅकेज देण्यात आले आहे.

सुंदर पिचाई यांना पुढील तीन वर्षांसाठी एकूण 1722 कोटी रुपयांचे (24.6 कोटी डॉलर) पॅकेज देण्यात आले आहे. कोणत्याही सर्च इंजीन कंपनीच्या अधिकाऱ्याला देण्यात आलेले हे सर्वात मोठे पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये 1680 कोटी रुपयांचे (24 कोटी) शेअर आणि 42 कोटी रुपयांच्या (60 लाख डॉलर) टेक होम सॅलरीचा समावेश आहे.

आज आहे एक ‘खास’ दिवस, गुगलने साकारलं डुडल

गुगलने शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजारला दिलेल्या माहितीनुसार, सुंदर पिचाई यांना 2020 पासून प्रत्येक वर्षी 14 कोटी रुपये सॅलरी देण्यात येईल. विशेष म्हणजे सुंदर पिचाई यांच्या आधारी लॅरी पेज हे अल्फाबेटचे सीईओ होते आणि ते फक्त 1 डॉलर सॅलरी घेत होते.

अॅपलच्या सीईओला टक्कर
अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सॅलरीवर नजर ठेवणारी कंपनी इक्विलरचे मार्केटिंग मॅनेजर अमित बातीश यांनी सांगितले की, सीईओला मिळणाऱ्या सॅलरीची तुलना केली असता सुंदर पिचाई आणि अॅपलचे सीईओ टिम कूक यांच्यामधील अंतर कमी आहे. टिम कूक अॅपलचे सीईओ झाले तेव्हा त्यांना 2632 कोटींचे पॅकेज देण्यात आले होते.