नाताळ, थर्टी फर्स्ट बोंबलला! कोकण रेल्वेमार्गावर आठ तासांचा मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण रेव्लेमार्गावर आडवली स्थानकावर 27 आणि 28 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोकण आणि गोव्याकडे जाणाऱया काही गाडय़ांवर त्याचा परिणाम होणार असून कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे तर नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कोकण, गोव्याकडे जाणाऱया पर्यटकांना या मेगाब्लॉकचा फटका बसेल.

शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी रत्नागिरीतील आडवली रेल्के स्थानकावर लूप लाइन क्रमांक 2 चे काम होणार आहे. त्यासाठी मध्यरात्री 11.45 वाजल्यापासून 28 डिसेंबरच्या सकाळी 7.45 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या 8 तासांच्या कालावधीमध्ये निकसर ते विलकडे स्थानकांदरम्यान रेव्ले वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

या गाडय़ांवर ‘ब्रेक’…

12133 मुंबई शिवाजी महाराज टर्मिनल-मंगलुरू एक्स्प्रेस, 16335 गांधीधाम-नागरवोइल एक्स्प्रेस, 22659 कोचुकेली-देहराडून एक्स्प्रेस, 10111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगाव कोकण कन्या एक्प्रेस, 11003 दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, 12617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दिन मंगला एक्स्प्रेस, 11099 एलटीटी-मडगाव डबलडेकर एक्प्रेस, 19331 कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस, 50102 मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर आणि 50101 रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर या दहा गाडय़ांवर मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.