
विलेपार्लेच्या साठ्ये महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नवनवीन संकल्पना असलेला जाणीव हा सामाजिक उपक्रम 16 ते 17 या दोन दिवसात राबवण्यात आला. ‘युवा बदलाची सुरुवात माझ्यापासून’ अशा मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित हा उपक्रम होता. धावपळीच्या आयुष्यात तरुण पिढीतील सामाजिक जाणीव वाढीस लागावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व त्यामुळे तरुणांना त्यांच्या सुप्त गुणांना दाखवण्यासाठी हे एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले. सामना ऑनलाईन हे या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक होते.
या महोत्सवाचे उद्घाटन वाकोला पोलीस स्टेशन चे ए.सी.पी. चंद्रशेखर गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा समन्वयक मिनाक्षी सामंत, साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखर गायकवाड यांनी ‘युवक हे हिंदुस्थानाचे उज्वल भविष्य आहेत’ असं म्हणतानाच सुजाण युवकाच्या अंगी असलेल्या ताकदीचे वर्णन केले.
जाणीव हा आंतरमहाविद्यालयीने महोत्सव असून यामधध्ये मुंबई,ठाणे,मुंबई उपनगर व इतर जिल्यातील ५२ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये पथनाट्य, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व, गृप डान्स,ओपन माईक अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मुंबई विद्यापीठातील ‘राष्ट्रीय सेवा योजने’चे समन्वयक डॉ.सुधीर पुराणिक यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यात कनिष्ठ महाविद्यालयाची बेस्ट कॉलेज ट्रॉफी ‘रुईया कॉलेज’ तर वरिष्ठ महाविद्यालयाची बेस्ट कॉलेज ट्रॉफी ‘सिध्दार्थ कॉलेज’ यांनी पटकावली.























































