
उत्तर प्रदेशमधील बनारस हिंदू विद्यापीठात भूत विद्येचा सहा महिन्यांचा कोर्स सुरू होणार आहे. यात कोर्समध्ये विद्यार्थ्यांना सायन्स ऑफ पॅरानॉर्मिटी शिकवण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात याचा पहिला वर्ग भरेल.
द वीक या मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार आयुर्वेदिक डॉक्टर आणि एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये प्रवेश घेता येईल. देशात भूतविद्येवर आधारित अभ्यासक्रम असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आयुर्वेद शाखेच्या अधिष्ठाता यामिनी त्रिपाठी म्हणाल्या की, भूत विद्या ही अष्टांग आयुर्वेदाची आठवी शाखा आहे. या विद्येच्या माध्यमातून भूत पिशाश्च संदर्भातील आणि मनोविकार दूर करता येतात असेही त्रिपाठी यांनी सांगितले. आयुर्वेद आणि फार्मासंशोधनाच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकानुसार सुश्रृत ऋषींनी भूतविद्या ही संकल्पना मांडली आहे. ही विद्या आयुर्वेदाची एक शाखा आहे. देव, दैत्य, गंधर्व, यक्ष, राक्षस, पितर, पिशाश्च, नाग यांच्यामुळे ज्या व्याधी होत्यात त्या शांतीपथ, बलिप्रदान आणि हवनामुळे दूर करता येतात. त्यालाच भूतविद्या म्हणतात
























































