3 जानेवारी रोजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समिती सभापती निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि विषय समिती सभापतीची निवडणूक 3 जानेवारी 2019 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यखातेखाली पार पडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांची सत्ता जिल्हा परिषदेत आहे.

रायगड जिल्हा परिषदेची 2017 मध्ये निवडणूक होऊन राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप अशी आघाडी सत्तेवर आली. जिल्हा परिषदेमध्ये शेकाप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 12, काँग्रेस 3 आणि भाजप 3 असे एकूण 59 सदस्य पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांची आघाडी होऊन अध्यक्ष, महिला बालकल्याण, शिक्षण आरोग्य सभापती राष्ट्रवादीकडे तर अर्थ व बांधकाम, कृषी, समाजकल्याण सभापती शेकापकडे अशी वाटणी झाली होती. अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला असून अध्यक्ष आणि विषय समिती सभापती पदासाठी 3 जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यावेळी आघाडी कडून शेकापकडे अध्यक्ष पद जाणार आहे.

रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडले आहे. शेकापकडे योगिता पारधी, पदी ठाकरे (पनवेल), काँग्रेस अनुसया पादीर (कर्जत), शिवसेना सहारा कोळंबे (कर्जत) या चार जणी अनुसूचित जमातीमधील अध्यक्ष पदाच्या दावेदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडी असल्याने यावेळी शेकापला अध्यक्ष पद मिळणार आहे. त्यामुळे शेकापक्षाकडून योगिता पादीर यांचे नाव आघाडीवर आहे.