
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी लखनऊच्या लोकभवन परिसरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 25 फुटी कांस्य धातूपासून बनवण्यात आलेल्या मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणाऱ्या कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर, रामजन्मभूमीच्या निर्णयावर आणि नागरिकता सुधारणा कायद्यावर तसेच कायद्याविरोधात रस्त्यावर उतरून लोकांनी केलेल्या हिंसक आंदोलनावरही टिप्पणी केली.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या लोकांना उद्देषून बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर आपण नेहमीच अधिकारांबाबत बोलत आलो आहोत, मात्र वेळेनुसार आता आपण आपल्या कर्तव्यावरही भर दिला पाहिजे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ज्या लोकांनी हिंसाचार केला, सरकारी संपत्तीचे नुकसान केले त्यांनी एकदा स्वत:ला प्रश्न विचारायला हवा. विरोधाता हा पर्याय योग्य होता? जे जाळले ते त्यांच्या पुढीच्या पिढीच्या कामी येणार नव्हते? असा सवालही मोदींनी उपस्थित केला. तसेच हिंसाचारात ज्या लोकांचा मृत्यू झाला, जे लोक जखमी झाले त्यांच्या कुटुंबीयांबाबत आपल्याला विचार करावा लागेल. रस्तेवाहतुकीवर नागरिकांचा अधिकारी आहे आणि तो सुरक्षित ठेवणे आपले कर्तव्य आहे. अधिकारी आणि कर्तव्य सोबत असणे आवश्यक आहे, असेही मोदी म्हणाले.
PM Modi: Better roads,transport&sewer are our rights, but it’s our duty to protect it.Quality education is our right but safety of educational institutions&respect for teachers are our duties. Secure atmosphere is our right,but it’s also duty of citizens to respect work of police https://t.co/nskRfcJ0rb
— ANI UP (@ANINewsUP) December 25, 2019
कलम 370 बाबत बोलताना मोदी म्हणाले की, दशकांपूर्वीचा हा आजार होता आणि आम्हालाही तो पिढीजातपणे तो मिळाला, मात्र आम्ही त्यावर योग्य उपाय केला. त्यामुळे अनेकांच्या आशा-आकांशा तुटल्या, असेही म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच रामजन्मभूमिचा वादही शांततेच्या मार्गाने सोडवण्यात आला, असेही मोदी म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत बोलता मोदी म्हणाले की, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून जे गरीब, दलित आझादीनंतर हिंदुस्थानमध्ये आले त्यांना आम्ही नागरिकत्व देण्याचे काम केले. जे बाकी आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
PM Narendra Modi in Lucknow: Issues of Article370, Ram Temple have been resolved peacefully. The way to give citizenship to refugees from Pakistan, Bangladesh, Afghanistan has been cleared. 130 crore Indians have found solution to such challenges with confidence. pic.twitter.com/kglKRKa549
— ANI UP (@ANINewsUP) December 25, 2019





















































