संघ आणि भाजपाचा देशात अराजक माजवण्याचा कट, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुधारित नागरिकत्क कायदा, एनआरसी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी असे कायदे करून राष्ट्रीय स्कयंसेवक संघ आणि भाजप सरकारने या देशात अराजक माजकण्याचा कट रचला आहे. हा कायदा केवळ मुसलमानांच्याच नव्हे तर 40 टक्के हिंदूंच्याही विरोधात आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला. डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचे नसेल तर भाजप सरकार पाडा असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.

एनआरसीविरोधातील आंदोलनानंतर प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, एनआरसीबाबत जाहीरपणे बोललो नाही, तसेच संसदेतही त्याबाबत चर्चा झाली नाही असे पंतप्रधान म्हणत असतील तर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्ही देशात एनआरसी लागू करणार हे विधान कसे केले? सरकारने आणलेली डिटेन्शन कॅम्पची पद्धत ही ब्रिटिशांनी आणलेली पद्धत आहे. या देशाच्या क्यकस्थेने शिक्षणाची दारे बंद केली. त्यामुळे आजही महाराष्ट्राच्या रस्त्याकर फिरताना अनेक जमाती दिसतात. आजही देशातील अनेकांचे संसार गाढवाच्या पाठीवर आहेत. त्यांच्याकडे कसलेही पुरावे नाहीत. बाप कुठे मेला, आजोबा कुठे मेला हेही अनेकांना माहीत नाही त्यांच्याकडून नागरिकत्वाचे पुरावे मागितले जाणार आहेत. हा अन्याय आहे. पाच वर्षांसाठी आपण यांना निवडून देतो. पण लायसन्स रिनिव्ह करायला पाच वर्षांनी येतील तेव्हा धोबीपछाड दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.

28 डिसेंबरला काँग्रेसचा मुंबईत ‘संविधान बचाओ’ मार्च

काँग्रेसतर्फे ‘भारत बचाओ-संविधान बचाओ’ रॅली काढण्यात येणार आहे. शनिवार 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 काजता मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळय़ापर्यंत हा फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. काँग्रेसच्या संविधान रॅलीनिमित्ताने गांधीभवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होत. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, आज केंद्रातील भाजप सरकारच्या लोकशाहीविरोधी आणि संविधानविरोधी कार्यपद्धतीने देशात धार्मिक आणि सामाजिक फूट पाडण्याचा प्रयत करत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी या देशात ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण राबवले होते. तीच परिस्थिती भाजपचे केंद्र सरकार पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप सरकार विरोधात स्वातंत्र्यलढय़ाप्रमाणे लढा उभारावा लागणार आहे.

भाजपची समर्थनार्थ रॅली

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात निदर्शने होत आहेत. याला उत्तर म्हणून भाजपकडून मुंबईत 27 डिसेंबर रोजी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी रॅली काढण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी अशी ही ‘संविधान सन्मान रॅली’ काढण्यात येणार आहे. या रॅलीत फडणकीस यांच्यासह उद्योजक सुरेश हाकरे, साकरकर स्मारक अध्यक्ष रणजीत साकरकर, नाटय़संपदा कलामंचचे अनंत पळशीकर, आमदार अतुल भातखळकर आदी सहभागी होणार आहेत.

मुंबईत ‘इन्कलाब’ मोर्चा जमिया, जेएनयू, एएमयू, आयआयटी, टीसमधील विद्यार्थ्यांचा समावेश

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) याविरोधात विविध शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थी उद्या आझाद मैदानात भव्य निदर्शने करणार आहेत. त्यात जमिया मिलिया, जेएयू, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, आयआयटी मुंबई आणि टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसमधील (टीस) हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

सीएए कायदा रद्द करा आणि एनपीआर व एनआरसी थांबवा अशी मागणी करण्यासाठी हा ‘इन्कलाब’ मोर्चा काढला जाणार आहे. सुरुवातीला भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत मोर्चा काढण्याची योजना होती पण नंतर आझाद मैदानात निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘जॉइंट ऍक्शन कमिटी फॉर सोशल जस्टीस’च्या वतीने या निदर्शन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निदर्शनांमध्ये जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यासह जमिया, एमयू, टीस आणि आयआयटी मुंबईतील विद्यार्थी तसेच उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील आणि अभिनेत्री स्वरा भास्कर आदी सहभागी होणार आहेत.