
उडती शवपेटी म्हणून नाके मुरडण्यात आलेल्या ‘मिग-27’ या फायटर जेट विमानांना हिंदुस्थानी हवाई दलाने शुक्रवारी अलविदा म्हटले. गेल्या तीन दशकांपासून लष्कराच्या सेवेत असलेल्या या लढाऊ विमानाने शुक्रवारी आपले अखेरचे उड्डाण घेतले. जोधपूर येथील एअर बेसवर ‘मिग-27’ जातीची एकूण सात विमाने आहेत.
पाकडय़ांविरुद्ध कारगीलच्या युद्धात 1999 साली या विमानांनी अविस्मरणीय कामगिरी केली होती. या विमानांना अखेरचा निरोप देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळय़ाला हिंदुस्थानी हवाई दलाचे एअर मार्शल एस. के. घोटिया हेदेखील उपस्थित होते.




























































