
उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कडाका पडला आहे. द्रास प्रांतात रविवारी उणे 28 इतके सर्वात कमी तापमान नोंदले गेले. दिल्लीसह, पंजाब, हरयाणा, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश राज्यांना रेल ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मध्य प्रदेश 10 शहरांत किमान तापमान 5 अंशापेक्षा कमी आहे. राजस्थानच्या पाच शहरांत पारा श्न्यापेक्षा खाली आला आहे.
रविवारी दिल्लीचे किमान तापमान 3 डिग्री राहिले. जयपूरमध्ये तापमान 3.4 डिग्री, भोपाळ आणि पाटणा येथे 7 डिग्री, रांचीमध्ये 6 डिग्री नोंद झाली. अनेक ठिकाणी पिकांवर आणि वाहनांवर बर्फ साचले आहे. हवामान विभागाच्या मते, उत्तराखंडच्या डोंगराळ भागात 1 आणि 2 जानेवारी रोजी बर्फ पडेल. त्यामुळे थंडी आणखी वाढेल.
ट्रेन, विमानांचे मार्ग बदलले
दाट धुक्यांमुळे 194 ट्रेन उशिरा धावत होत्या, तर 71 ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला. यामध्ये दुरांतो आणि राजधानीसह अनेक सुपरफास्ट ट्रेनचा समावेश आहे. एकूण 66 ट्रेन रद्द करण्यात आल्या तर 11 ट्रेनची वेळ बदलली आहे. दिल्ली विमानतळावर दृश्यमानता कमी असल्याचे चार विमानांचा मार्ग बदलण्यात आला. 20 डिसेंबरपासून आतापर्यंत 750 हून अधिक विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला आहे. तर 19 विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. दिल्ली, पाटणा, गुवाहाटी, वाराणसी, ग्वाल्हेर येथे खराब हवामानामपुले उड्डाणे प्रभावित होतील, असा इशारा स्पाईसजेटने दिला आहे.
आणखी कडाका वाढणार
स्कायमेटच्या अंदाजानुसार 31 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी रोजी पावसाची शक्यता आहे. उत्तर हिंदुस्थानातील डोंगराळ भागात 3 जानेवारी रोजी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढू शकतो.
राजस्थान
जयपूरमध्ये काल रात्री पारा 3.4 अंशपर्यंत खाली आला. गेल्या दहा वर्षांतील ही सर्वाधिक थंड रात्र ठरली. सिक्री फतेहपूर येथे रात्री पारा उणे 4 अंश वाढून शून्य डिग्रीवर आले. माऊंट अबू येथे पारा -1.5 ते -3.0 पोचला.
उत्तर प्रदेश
बरेली शहरात किमान तापमान 3.1 डिग्री नोंद झाली. मथुरा येथे 2 डिग्री, सीतापूर, बहराईच, अमेठी येथे 4 डिग्री तापमानाची नोंद झाली. प्रयागराज येथे किमान तापमान 2.9 डिग्री पोचले आहे.
पंजाब
पंजाबमध्ये डिसेंबर सुरू झाल्यापासून 7 सिव्हिअर कोल्ड डे आणि 8 कोल्ड डे यांचा रेकॉर्ड झालेला आहे. शनिवारी भटिंडा शहरात तापमान 3 डिग्रीची नोंद झाली. अनेक शहरांचे तापमान सिमला आणि मनालीपेक्षा कमी होते.
हिमाचल प्रदेश
लाहौल- स्पितीच्या तापमानाने 30 डिग्रीची नोंद केली. शनिवारी केलांगमधील पारा -20 पर्यंत खाली आला. ऊना सर्वाधिक थंड राहिले. ऊना येथे 0.5 तापमानाची नोंद झाली.
मध्य प्रदेश
राजधानी भोपाळ येथे रविवारी सकाळी किमान तापमान 7 डिग्री नोंदवले गेले. उज्जैन, रिवा, सागर, ग्वाल्हेर आणि चंबळ येथे शीतलहर आहे. अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली.
दिल्ली
दिल्लीत रविवारी सकाळी किमान तापमान 3 डिग्री नोंद झाले. शनिवारच्या 1.7 डिग्रीपेक्षा पारा जरा चढला आहे. गेल्या 100 वर्षांतील हा सर्वांत थंड डिसेंबर ठरला आहे.

























































