जयसिंगपुरात शिवसेनेने येडियुरप्पांचा  प्रतीकात्मक पुतळा जाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रचंड घोषणांच्या गर्जनेत कर्नाटक सरकारच्या विरोधात जयसिंगपूर शहरातून रॅली काढून निषेध करण्यात आला. या वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक सीमा भागाचा वाद उफाळून निघाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता व शिवसैनिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. कर्नाटकच्या निषेधार्थ जयसिंगपूर येथील क्रांती चौकात शिरोळ तालुका शिवसेना, महिला आघाडी युवासेना आणि शिव वाहतूक सेनेच्या वतीने निदर्शने करून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.