
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी 2020 हे वर्ष सर्वांना सुख, समाधान आणि भरभराटीचे जावो. आपले राज्य तसेच आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीच्या वाटेवर निरंतर अग्रेसर राहो. 2020 या नवीन वर्षासाठी मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.
























































