आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये दिग्गजांची हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पवई येथील आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’ महोत्सवात विज्ञान-तंत्रज्ञान, बॉलीवूड आणि राजकारण क्षेत्रातील दिग्गजही हजेरी लावणार आहेत. त्यात नोबेल पुरस्कार विजेते एरिक मसकीन आणि रिचर्ड रॉबर्टस् यांचाही समावेश आहे. अभिनेत्री विद्या बालन ही ‘महिला सबलीकरण’ या विषयावर आपली मते मांडणार आहे तर लष्करातील कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड हे ‘राष्ट्रनिर्मितीमध्ये तरुणांचे योगदान’ या विषयावर बोलणार आहेत. अभिनेत्री विद्या बालन आणि राज्यवर्धन राठोड यांची व्याख्याने 3 जानेवारी रोजी होणार आहेत तर मसकीन आणि रॉबर्टस् यांची व्याख्याने 5 जानेवारी रोजी होणार आहेत.