
पाकिस्तानमध्ये जेव्हा अल्पसंख्यांकांवर अत्याचार झाले तेव्हा लोकांनी का नाही आंदोलन केले असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या एका सभेत केला आहे. देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून गदारोळ सुरू आहे. या कायद्यावरून ज्यांनी आंदोलन केले त्यांना पंतप्रधान मोदी यांनी सुनावले आहे. तसेच जर आवाज उठवायचा असेल तर पाकिस्तानच्या विरोधात आवाज उठवा असेही मोदी म्हणाले.
अगर आपको नारे लगाने ही हैं तो पाकिस्तान में जिस तरह अल्पसंख्यकों पर अत्याचार हो रहा है, उसे जुड़े नारे लगाइए।अगर आपको जुलूस निकालना ही तो पाकिस्तान से आए हिंदू-दलित-पीड़ित-शोषितों के समर्थन में जुलूस निकालिए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पाकिस्तानातून जीव वाचवून आलेल्या लोकांविरोधात का जुलुस काढले जात आहेत? जे लोक आपला आणि आपल्या मुला बाळांचा जीव वाचवून पाकिस्तानहून हिंदुस्थान आले तर त्यांच्याविरोधात जुलूस काढले जात आहेत. परंतु गेली अनेक वर्षे पाकिस्तानात त्यांच्यावर अत्याचार होत आहेत तेव्हा यांची तोंडं गप्प का होती?” तसेच जर तुम्हाला घोषणाबाजी करायची असेल तर पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करा. जर तुम्हाला आंदोलन करायचेच असेल तर गेली 70 वर्षे पाकिस्तानने जे कारनामे केले आहेत त्यांच्याविरोधात आवाज उठवा असेही मोदी म्हणाले.

























































