
एका मासेमारी करणाऱ्या बोटीवर लहान हत्तींच्या आकाराचे दोन ‘सील’ मासे बसल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हे दोन सील मासे या बोटीवर इतक्या आरामात बसले आहे की जणू ही बोट त्यांचीच आहे. सील माश्याचा हा व्हिडीओ अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील आहे. हा् व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ ऑलिंपियाच्या Eld Inlet येथील आहे. बोटीत दोन सील मासे बसले आहेत. हा व्हिडीओ पाहून असे दिसते की ही बोट केव्हाही बुडू शकते. या सील मास्यांची उंची सील 11 फूटांपेक्षा जास्त आहे. त्यांचे वजन 1200 किलो पर्यंत आहे.


























































