
तेलंगणातील भाजप खासदार डी. अरविंद यांनी एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांना भर मैदानात उलटा टांगून त्यांची दाढी कापून टाकेन अशी धमकी दिली आहे. डी. अरविंद इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ओवेसीची कापलेली दाढी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या चेहऱ्याला चिकटवेन असे वादग्रस्त वक्तव्य देखील केले आहे.
BJP Nizamabad MP Dharmapuri Arvind: I warn you(Asaduddin Owaisi) that I will hang you upside down to a crane and shave your beard. I will give promotion to your beard by sticking it to the Chief Minister. #Telangana (3.1.20) pic.twitter.com/9Tpy43Qb4P
— ANI (@ANI) January 4, 2020
असदुद्दीन ओवेसी यांनी निझामुद्दीन येथे नागरिकत्व कायद्याविरोधात भाषण करताना भाजपवर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना डी. अरविंद यांची जीभ घसरली आहे. ‘ज्या मैदानात भाजपविरोधात वक्तव्य केलं. त्याच मैदानात क्रेन आणून त्यांना उलटा टांगेन व त्यानंतर त्यांची दाढी कापून टाकेन. त्यांच्या दाढीला प्रमोशन देण्यासाठी मी ती दाढी मुख्यमंत्र्याच्या चेहऱख्याला चिकटवेन. जेणेकरून लोकांना ते देखील मुल्ला आहेत हे समजेल’, असे वादग्रस्त वक्तव्य अरविंद यांनी केले आहे.
























































