
हिंदुस्थानमध्ये नागीण डान्स हा खूप लोकप्रिय आहे. अनेक लग्न समारंभात काही जण अशा प्रकारचा नागीण डान्स करतात. परंतु एक दारू प्यायलेला व्यक्ती चक्क नागिणीसोबत डान्स करत होता. अर्थात हा डान्स त्याला चांगलाच महागात पडला आहे.
नशा शराब में होता तो नाचती बोतल… pic.twitter.com/9Vp9wk4eaZ
— anuragamitabh انوراگ امیتابھ अनुरागअमिताभ (@anuragamitabh) January 4, 2020
राजस्थानच्या दौसा भागात एक दारूडा व्यक्ती एका सापासोबत नाचत होता. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दारूडा व्यक्ती सापासोबत नाचत असून कधी त्याच्यासमोर झोपत आहे तर कधी त्याला गळ्यात घालत आहे. यात सापाला त्रास झाला असून त्याने अनेक वेळा या दारूड्या व्यक्तीला डसले. डसल्यामुळे दारूडा व्यक्ती चांगलाच काळा निळा पडला आहे. उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ त्याला जवळच्या इस्पितळा दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला वाचवले असून पुढील उपचार सुरू आहेत.

























































