बाभळेश्वर मध्ये एटीएम फोडून चोरट्यांनी 20 लाख लांबविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडून यातील 19 लाख 93 हजार 200 रुपये इतका इतकी रक्कम लांबवली आहे. सदर घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बाभळेश्वर येथे लोणी संगमनेर रोड लगत घोगरे पेट्रोल पंपाच्या समोर बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आणि एटीएम आहे सर्वसाधारणपणे मध्यरात्रीच्या सुमारात चोरट्यांनी एटीएम दरवाजा तसेच इतर साहित्याची तोडफोड करुन आत प्रवेश केला. संपूर्ण एटीएम बाहेर काढले एटीएम जड असल्यामुळे ते एटीएम गाडीद्वारे ओढून रस्त्याच्या पलीकडे नेण्यात खुणा या ठिकाणी दिसतात.

यावेळी आवाजाने परिसरातील काही नागरिक जागे झाले यांची चाहूल चोरट्यांना लागली. एटीएम गाडीला लावून चोरट्याने लोणीच्या दिशेने धूम ठोकली. एटीएमचे बरेच पार्ट रस्त्याच्या कडेला दिसून आले आहेत बाभळेश्वर येथील काही तरुणांनी गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु भरधाव वेगाने ती गाडी निघून गेली आजपर्यंत या ठिकाणी दोनदा एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्यामुळे फुटेज दिसत नाही. महाराष्ट्र बँक खाजगी कंपनीद्वारे एटीएम चालवते.

सदर बँकेची सुरक्षा ही रामभरोसे आहे. राञीच्या वेळी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सिक्यरिटी गार्ड किंवा वॉचमेन नसतो. याबाबत लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करत असून परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनेने लोणी पोलिसांना चोरट्यांनी जणू आव्हानच दिले आहे.