
अमेरिका इराण संघर्षाचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. शेअर बाजार 700 हून अधिक अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीही 638 अंकांनी कोसळला आहे.
अमेरिकेने एअर स्ट्राईक करून इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानील मारले होते. त्यामुळे इराण आणि अमेरिकेत चांगलाच संघर्ष निर्माण झाला आहे. दोघांमध्ये युद्धाची शक्यता निर्माण झाली असून पेट्रोलच्या किंमतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती. याच पार्श्वभुमीवर हिंदुस्थानमधील सेन्सेक्स कोसळला आहे. तसेच निफ्टीचे अंकही कोसळले आहे.
सेन्सेक 700 हून अधिक अंकांनी तर निफ्टी 638 अंकांनी कोसळला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, मारुती सुझुकी, एशियन पेंटसचे शेअर्स दोन टक्क्यांनी घसरले आहेत. तर निफ्टीतील पीएसयु बँकेचे शेअर्सही दोन टक्क्यांनी घसरले आहेत.























































