
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये झालेल्या हल्ला प्रकरणावर राजकारण करू नका असे आवाहन केले. वाचा उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
- युवक हे आपले उद्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांची विचारधारा ही महत्त्वाची आहे.
- युवक आपल्या वसतिगृहात सुरक्षित नसतील हे देशाला कलंक असल्यासारखे आहे.
- सर्व युवक हे महाराष्ट्रात सुरक्षित आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही जर काही झाले तर आम्ही माफ करणार नाही.
- बुरखाधारी चेहरे समोर आले पाहिजेत. ते डरपोक आहेत. त्यांच्यात हिम्मत नाही आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
- महाराष्ट्रामध्ये असले प्रकार कदापी सहन केले जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व युवकांना मी हेच सांगेन की दुसरीकडे जे काही घडतं ते अयोग्य आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काळजी करण्याचं कारण नाही.आपण महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहात.
- डरपोकांचे समर्थक हिंदुस्थानात नसतात.
- माझं म्हणणं एवढंच आहे की सगळ्यांची निपक्षपातीपणाने चौकशी होऊ द्या आणि हल्लेखोरांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा हा ओरबाडून जनतेसमोर आला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे
“माझं म्हणणं एवढंच आहे की सगळ्यांची निपक्षपातीपणाने चौकशी होऊ द्या आणि हल्लेखोरांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा हा ओरबाडून जनतेसमोर आला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे.”
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/FUJFdocfmp— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 6, 2020
- जवाहरलाल नेहरु विद्यापीठ हल्ला यावर राजकारण नको.
- तरुण हे बॉम्ब सारखे आहेत त्यांना भडकवू नका. तरुणांचा उद्रेक बाहेर येतोय.
- मी संपूर्णपणे तरुणांच्या सोबत आहे त्यांनी घाबरायचे कारण नाही. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.
- काही जण भातुकलीचा खेळ खेळत आहेत त्यांना खेळू दे. भाजपचे माजी मंत्री मुनगंटीवार यांच्या गुड़ी पाडव्याला सरकार बदलणार या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा टोला
- अशोक गेहलोत हे सहज भेटायला आलेले होते.
- पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.




























































