
पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्हा परिषदांच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेने एकूण 49 ठिकाणी विजय मिळविल्याने 13 जागा वाढल्या असून पंचायत समितीच्या निवडणुकांत 117 जागी विजय मिळवत मागील निवडणुकीच्या तुलनेत 24 जागांची वाढ झाली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धुळे, नंदुरबार वगळता फारसे यश न मिळालेल्या भाजपला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे.
नागपूर व पालघर जिल्हा परिषदांमध्ये भाजपला सपाटून मार खावा लागला आहे तर दुसरीकडे शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत धुळय़ामध्ये दोन जागांवरून चार, नंदुरबारमध्ये शून्यावरून थेट 7, अकोल्यात दोनवरून 13, तर पालघरमध्ये 15 जागांवरून थेट 18 जागांवर शिवसेनेने मुसंडी मारली आहे. या पाच जिल्हा परिषदांत शिवसेनेने मागील 36 जागांच्या ठिकाणी 49 जागा जिंकल्या आहेत.
या जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसला 100 जागा मिळाल्या होत्या. आता 73 जागांकर समाधान मानाके लागले आहे. राष्ट्रकादी 53 करून 46 पर्यंत आली आहे. या दोन्ही पक्षांकडे झेडपीच्या 153 जागा होत्या. त्या आता 119 झाल्या आहेत. नोंदणीकृत पक्षांनी 32 करून 42 मुसंडी मारली आहे. तर अपक्ष 18 करून 14 जागांकर आले आहेत. या जिह्यांतील पंचायत समितीमध्ये 2012-2013 च्या तुलनेत काँग्रेसला 170 वरून 145, राष्ट्रकादी 127 वरून 80 कर आली आहे. नोंदणीकृत पक्षांनी 69 करुन 78 पर्यंत मजल मारली आहे.
पंचायत समित्यांतही सरशी
पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही मागील 2012-2013च्या तुलनेत हीच सरशी राखत शिवसेनेने पालघरमध्ये 34 वरून 47, वाशिममध्ये 13 वरून 18, अकोल्यात 15 वरून 26, नंदुरबारमध्ये शून्यावरून थेट 14, धुळय़ामध्ये 9 जागांवरून 10 जागांवर विजय संपादन केला आहे.



























































