
आयसीआयसीआय बॅकेंच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. ईडीने शुक्रवारी केलेल्या कारवाईत कोचर यांच्या दक्षिण मुंबईतील आलिशान घरासह तब्बल 78 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
पती दीपक कोचर यांना फायदा व्हावा यासाठी पदाचा गैरवापर करीत व्हिडीओकॉन कंपनीला मोठे कर्ज मंजूर केल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे. याप्रकरणी ईडीने अनेकदा त्यांची चौकशीदेखील केली आहे. शुक्रवारी ईडीने त्यांचे दक्षिण मुंबईतील आलिशान घर, काही शेअर्स, गुंतवणूक आणि दीपक कोचर यांच्या न्यू पॉकर रीनीकेबल्स कंपनीच्या कार्यालयावर जप्ती आणली आहे.
























































