आरोपी डीएसपी दविंदरने हिज्बुलच्या दहशतवाद्यांना दिला होता आसरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये शनिवारी हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसह एका पोलीस अधिकार्‍याला अटक करण्यात आली होती. डीएसपी दविंदर सिंह असे या पोलीस अधिकार्‍याचे नाव असून राष्ट्रपती पदकाने त्याचा सन्मानही झाला होता. दविंदर सिंहने हिज्बुलच्या दहशतवाद्यांना आसरा दिला होता अशी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दविंदरकडे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर संपत्ती होती. दविंदरकडे जम्मू कश्मीरच्या गाडीगढमध्ये एक घर आहे. तिथे त्याचे काही नातेवाईक राहतात. दक्षिण कश्मीरमध्ये त्याचे घर आहे. तसेच श्रीनगरमध्ये बादामी भागातही त्याचे एक अलिशान घर आहे.

शनिवारी जम्मू कश्मीर महामार्गावर मीर बाजारमध्ये दविंदर सिंहला दहशतावाद्यांसोबत पकडले. त्या दिवशी दहशतवाद्यांनी दविंदरच्या घरीच रात्रीचे जेवण घेतले. तसेच या दहशतवाद्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचवण्याची जवाबदारी दविंदरकडे होती. दविंदरनेच या दहशतवाद्यांना अपाल्या घरी आसारा दिला होता. पोलिसांनी दविंदरच्या बादामी भागात जेव्हा छापा टाकला तेव्ह पोलिसांना एके 47 दोन पिस्तुल सापडल्या.