ती मी नव्हेच! जेएनयूची विद्यार्थिनी कोमल शर्माची महिला आयोगाकडे धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेएनयूतील विद्यार्थिनी कोमल शर्मा हिने राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागितली आहे. जेएनयूच्या कॅम्पसमध्ये चेहरा झाकून हल्ला करणारी ती महिला दुसरीच आहे असे असताना माझा हल्लेखोर म्हणून उल्लेख करून वृत्तवाहिनीने माझी बदनामी केली, असा दावा कोमलने केला आहे.

जेएनयूतील 5 जानेवारीच्या हल्ला प्रकरणात वृत्तवाहिनीने काहीही पुरावा नसताना माझे हल्लेखोर म्हणून नाव घेतले आहे. आरोप करण्यापूर्वी वृत्तवाहिनीने माझ्याशी संपर्क साधला नाही, माझे म्हणणे ऐकून घेतले नाही, असे कोमलने म्हटले आहे. या प्रकरणात महिला आयोगाने लक्ष घालावे, अशी विनंती तिने केली आहे. तिच्या तक्रारीची दखल घेत आयोगाने दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांना पुढील सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.