पुण्यात खासदार संजय राऊत यांची दिलखुलास मुलाखत; रोखठोक फटकेबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्रकारितेत स्वातंत्र्य सहज मिळत नसतं. ते तुम्हाला संघर्षातून मिळवावं लागतं. आणीबाणीच्या काळातही पत्रकारांनी संघर्ष केला. आता जर कोणाला लेखणीवर बंधने आली असल्याचे वाटत असेल तर त्यांनी संघर्ष केला पाहिजे. ही जर हिंमत असेल तर त्यांनी स्वातंत्र्याच्या गप्पा माराव्यात, नाहीतर त्यांनी शांत बसावं. तुमचं कोणी तोंड दाबून धरत नाही, असे ठाम मत माध्यम स्वातंत्र्यावर येणार्‍या बंधनांवर बोलताना दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात मोलाची भूमिका बजाकणारे खासदार संजय राऊत यांची बुधवारी लोकमत पत्रकार पुरस्कार सोहळ्यात मुलाखत घेण्यात आली. त्या वेळी त्यांनी निकालाआधीच ठरलेलं सत्तास्थापनेचं प्लॅनिंग, पत्रकारितेतले दिवस, उदयन भोसले यांची शिकसेनेवरील टीका, भाजपकडून वारंवार उपस्थित केला जाणारा हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचं नातं यांसह अनेक मुद्द्यांकर दिलखुलास भाष्य केलं. ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. या वेळी लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा व्यासपीठाकर उपस्थित होते. टिळक स्मारक मंदिर येथे तब्बल सवा तास चाललेल्या मुलाखतीला पुणेकरांनी तुडुंब गर्दी केली होती. मुलाखतीदरम्यान सभागृहात टाळ्या, शिट्ट्या आणि हश्याची कारंजी उसळत होती…

उदयन भोसले यांनी वंशज असल्याचे पुराके द्यावेत!

उदयन भोसले यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येते तेव्हा आम्ही नतमस्तक होतो. मात्र उदयन सातार्‍यात काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. या देशात लोकशाही आहे. त्यामुळे त्यांना बोलू द्या. ते माजी खासदार आहेत. भाजपचे नेतेही आहेत. त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत. आम्ही शिवरायांना दैवत मानतो.

शरद पवार हे ‘जाणते राजे’च!  

शरद पवार हे निश्चितपणे ‘जाणते राजे’ आहेत. जनतेने त्यांना ही उपाधी दिली आहे. तशीच महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेनं त्यांना राजा मानलं. लुटमार करणारा राजा होत नाही, रक्षण करणारा राजा असतो. शिवरायांकर कुणाचाही मालकी हक्क असू शकत नाही. जो या महाराष्ट्रात आणि देशात समाजासाठी, शेतकर्‍यांसाठी, कष्टकर्‍यांसाठी काम करतो तो जाणता राजा असतो. त्यामुळे कुणीही त्यावर आक्षेप घ्यायची गरज नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे जनसामान्यांकर पगडा असलेले नेते आहेत. ते विजय खेचून आणू शकतात. परिवर्तन घडवू शकतात यावर माझा पहिल्यापासून विश्वास असल्याचे राऊत म्हणाले.