सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच अयोध्या दौरा करणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील, असे ट्विट शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केले. हे ट्विट दिवसभर गाजत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच. ही प्रभू श्रीरामाची कृपा आहे. सरकारला 100 दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन ते पुढील कार्याची दिशा ठरवतील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.