
बेस्टमध्ये कंत्राटी तत्त्वावर 400 बस वाहकांची भरती करण्याच्या जाहिरातीनंतर झालेल्या विरोधानंतर बेस्ट समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ही कंत्राटी भरती रद्द करावी, असे निर्देश बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी बेस्ट प्रशासनाला दिले. बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत कंत्राटी वाहक भरतीला सर्वच सदस्यांनी विरोध करत प्रशासनाने भरती प्रक्रियेची जाहिरात रद्द करावी, अशी मागणी केली होती.































































