
मुस्लिम पुरुषांप्रमाणे मुस्लिम महिलांना नमाज पढण्यासाठी मशिदीत प्रवेश करण्याची परवानगी आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती एका प्रतिज्ञापत्राद्वारे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सुप्रीम कोर्टाला सादर केली आहे. यासंदर्भात पुण्यातील यास्मिन अहमद पीरजादे यांनी याचिका दाखल केली आहे. आता सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे सदर याचिकेची सुनावणी होणार आहे. हे घटनापीठ केरळातील साबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी यासह विविध धर्मांतील महिलांबद्दल भेदाभेदाच्या कायदेशीर आणि घटनात्मक मुद्यावर विचार करणार आहे.
























































