
सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडररचे 21व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचे स्वप्न गुरुवारी भंगले. द्वितीय मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचने उपांत्य लढतीत तृतीय मानांकित स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला हरवून ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. 32 वर्षीय नोवाक जोकोविचचने फेडररवर 7-6(7-1), 6-4, 6-3 असा विजय मिळवला.
मुगुरुजा-केनिन जेतेपदासाठी भिडणार
महिला एकेरीत स्पेनची गार्बिन मुगुरुजा व अमेरिकेची सोफिया केनिन यांच्यात जेतपदाची लढत रंगणार आहे. सोफियाने अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीचा 7-6, 7-5 असा पराभव केला तर तर गार्बिनने रोमानियाच्या सिमोना हालेपला 7-6, 7-5 असे हरवले.




























































