
मुंबई आणि अन्य शहरांत लग्नासाठी कर्ज काढण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईत वेडींग लोनसाठीच्या अर्जात 51 टक्के वाढ झाली आहे. त्यातही महिलांनी लग्नासाठी कर्ज काढण्याचे प्रमाण जास्त आहे.
येत्या 9 फेबुवारी रोजी जागतिक विवाह दिन आहे. या पार्श्वभूमीवर इंडियालेंड्स ने वेडिंग लोन ट्रेंड्सचा अहवाल नुकताच जाहीर केला. त्यानुसार लग्नासाठी दागिने, हॉल, केटरिंग, पाहुण्यांच्या राहण्याची सोय अशा लग्नव्यवस्थेसाठी अर्जदार तीन ते चार महिने आधीच कर्जासाठी अर्ज करतात. कर्जाची रक्कम साधारणपणे दोन ते 30 लाख रुपये इतकी असते. विवाहानिमित्त वैयक्तिक कर्ज काढण्याचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले आहे. इंडियालेंड्सचा हा अहवाल कंपनीच्या 75 लाख ग्राहकांवर आधारित आहे.
- वेडिंग लोनसाठी केल्या जाणाऱया अर्जांपैकी 42 टक्के अर्ज महिलांनी केलेले असतात. आजच्या काळातील महिला आर्थिकदृष्टय़ा जास्त स्वावलंबी असल्याचे आणि त्यांच्या विवाहाचा भार पालकांवर टाकत नसल्याचे अहवालातून दिसून येते.
- तरुण पिढी म्हणजेच 22 ते 35 वर्षे वयोगटातील तरुण स्वतŠच्या लग्नाच्या खर्चाची तरतूद करताना दिसतात.
- दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता या प्रमुख शहरांमधून कर्जा सर्वाधिक अर्ज आले आहेत.
आजवरची पद्धत बघता हिंदुस्थानातील सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणासाठी, विवाहासाठी बचत करतात. मात्र युवा पिढी पालकांवर आर्थिक भार न टाकता स्वतŠचा खर्च स्वतŠच उभा करताना दिसत आहे. त्यासाठी डिजिटल लेंडर्सचा पर्याय निवडतात. – गौरव चोप्रा, सीईओ, इंडियालेंड्स































































