या वर्षीपासून आयसीएसई, सीबीएसई बोर्ड शाळा, महापालिकेच्या पब्लिक स्कूलच्या लोगोचे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या माध्यमातून या वर्षीपासून आयसीएसई व सीबीएसई बोर्ड शाळा चालविण्यात येणार आहेत. या शाळांच्या आकर्षक लोगोचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. यावेळी या शाळांमधील अद्ययावत सुविधांच्या ध्वनीचित्रफितीचे सादरीकरणही करण्यात आले.

पालिकेच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी या वर्षीपासून आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. देशात अशा शाळा सुरू करणारी मुंबई महानगरपालिका पहिलीच पालिका ठरणार आहे. यामध्ये पालिकेच्या जी/उत्तर विभागातील वुलन मिल महानगरपालिका शाळेमध्ये आयसीएसई बोर्डाची तर के/पूर्व विभागातील पूनम नगर महानगपालिका शाळेमध्ये सीबीएसई बोर्डाची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू होणार आहे. या शाळांच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सहआयुक्त आशुतोष सलील, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी उपस्थित होते.

ग्रँट रोड (नाना चौक) पूर्व-पश्चिमेला जोडणारा रेल्वे मार्गावरील पूल दुरुस्तीच्या कामासाठी पुढील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. तब्बल 99 वर्षे जुन्या या ब्रिटिशकालीन पुलाचे रिगर्डरिंगचे काम होणार असल्याने पुलावरची वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या भागात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. दुरुस्तीच्या दरम्यानच पुलावरून जाणाऱया केबल्स, वायर्स आणि पुलावरील पाइपलाइन्स बदलण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आणखी काही महिने तरी या मार्गावरून प्रवास करणाऱया नागरिकांना वाहतूककोंडीचा मनस्ताप सोसावा लागेल.