
दोन हजारांची नोट हळूहळू चलनातून बंद होण्याचे संकेत मिळत आहेत. ‘बिझनेस इनसाइडर’ या वेबसाइटने एका बँक अधिकाऱयाच्या हवाल्याने हे वृत्त दिले असून ग्राहकांना दोन हजारांच्या नोटा देऊ नका असे लेखी आदेश एका सरकारी बँकेने दिल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर एटीएममध्येही दोन हजारांच्या नोटा न भरता 100 आणि 200च्या नोटा भराव्यात, असेही आदेशात म्हटले आहे. बँकेने आपल्या सर्व शाखाधिकाऱयांना तसा ईमेल पाठवल्याचे वेबसाइटचे म्हणणे आहे. देशभरात सापडलेल्या एकूण बनावट नोटांपैकी तब्बल 56 टक्के नोटा या दोन हजारांच्या होत्या. त्यामुळेच हे पाऊल उचलल्याचे मानले जाते. अर्थात या वृत्ताला सरकारकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.


























































