
सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) देशभरात ठिकठिकाणी विरोध होत आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी सातत्याने या काद्याविरोधात मत व्यक्त करत आहेत.त्यांनी या कायद्याला विरोध करताना अनेक वादग्रस्त वक्तव्येही केली आहेत. आता त्यांनी पुन्हा या कायद्याविरोधात विधान केले आहे. आपण देशातच राहणार आहोत, मात्र, सीसीए, एआरसीसाठी आपण कोणतीही कागदपत्रे दाखवणार नाही. आपल्याकडे कागदपत्रांची मागणी झाली तर आपण छाती पुढे करू, हिंमत असेल तर गोळ्या चालवा, असे विधान करत ओवैसी यांनी कायद्यालाच आव्हान दिले आहे.
A Owaisi: Jo Modi-Shah ke khilaaf awaaz uthayega woh sahi maayne mein mard-e-mujahid keh layega…Main watan mein rahunga,kaagaz nahi dikhaunga. Kagaz agar dikhane ki baat hogi toh seena dikhayenge ki maar goli. Maar dil pe goli maar kyunki dil mein Bharat ki mohabbat hai.#CAA pic.twitter.com/5VOPBgK8Ze
— ANI (@ANI) February 10, 2020
“मोदी-शाह यांच्याविरोधात आवाज उठवेल तो खऱ्या अर्थाने मर्द-ए-मुजाहिद ठरेल. आपण या देशातच राहणार आहोत. तसेच यासाठी आपण कोणतीही कागदपत्रे दाखवणार नाही. आपल्याकडे कागदपत्रे मागितली तर आपण छाती पुढे करू. हिंमत असेल तर आपल्या हृदयावर गोळी मारा, आपल्या हृदयात हिंदुस्थानबाबतचे प्रेमच आहे.” असेही ओवैसी म्हणाले आहेत. याआधीही लोकसभेत बोलताना, सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) नागरिकत्व देतोपण आणि घेतोपण असे विधान त्यांनी केले होते. आसाममध्ये 5 लाख मुस्लीमांची नावे नाहीत. मात्र, आसाममधील बंगाली हिंदूंना नागरिकत्व देण्याची सरकारची इच्छा आहे. त्यामुळे या कायदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आपण घुसखोर नाही घुसखोरांचे बाप आहोत, असे वादग्रस्त विधान करताना सीसीए, एनपीआर आणि एनआरसी एकच आहे, असा दावाही त्यांनी केला होता.

























































