
आरक्षणाच्या मुद्द्यावरून कर्नाटकमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. राज्यात खासगी आणि सरकारी क्षेत्रात कानडी लोकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी कर्नाटक संघठनेगला ओक्कूटा या संघटनेने केली आहे.
कर्नाटक बंदला राज्यातील काही ठिकाणी हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी निदर्शकांकडून सरकारी बसेस लक्ष्य झाल्या. त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे. या बंदला रिक्षा, टॅक्सी, चालक संघटना, तसेच व्यापार संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
Mangaluru: Stones pelted on a Tirupati-Mangaluru bus in Farangipet. Several pro-Kannada groups have called for Karnataka bandh today demanding implementation of Sarojini Mahishi report which recommended certain percentage of jobs to Kannadigas in private&public sector companies pic.twitter.com/mPJXUXJTR5
— ANI (@ANI) February 13, 2020
सरोजिनी महिषी अहवाल लागू करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर्यां मध्ये कानडी लोकांना प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना या अहवालात करण्यात आली होती. परंतु या अहवालाच्या सूचना लागू करण्याचे काम सुरू असल्याचे सरकारने सांगितले आहे.
या बंद दरम्यान अनेक ठिकाणी हिंसा उफाळली आहे. अनेक सरकारी बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. बेंगळूरू विद्यापीठातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.
























































