देवगडमध्ये 16 हजाराची बेकायदा दारू जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड तालुक्यातील जामसंडे तरवाडी पुलानजीक बेकायदेशीर गोवा बनावटीची 16,160 रुपये किमतीची दारू विकण्याच्या उद्देशाने आपल्याजवळ बाळगल्याप्रकरणी भीमसेन अर्जुन जाधव (40, रा. पडवणे) याला रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामसंडे पडेलच्या दिशेने जाणाऱ्या तरवाडी येथील पुलानजीक विक्रीच्या उद्देशाने भीमसेन अर्जुन जाधव याच्याजवळ गोवा बनावटीची 16,160 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल अंकुश बाजीराव काळे यांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल शैलेंद्र कांबळे तपास करीत आहे. या मोहिमेमध्ये वाहतूक पोलीस मिलिंद परब, फक्रुद्दीन आगा, पोलीस नाईक रेखा कबले यांचा समावेश होता