जीएसटी भवनवरील तिरंगा वाचवणाऱ्या कर्मचाऱ्याचा सत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझगाव येथील जीएसटी भवनला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत जिवाची पर्वा न करता इमारतीवरील राष्ट्रध्वज सुखरूप खाली आणणाऱया कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शाल, श्रीफळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला.