पीएमपीएल बसमध्ये चोरी करणारे दोघे जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएमपीएल बसप्रवासात नागरिकांचा मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला. गणेश सिद्राम गायकवाड (वय 34), कृष्णा मारूती जाधव ( वय 28, रा. दोघेही- सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धीरज चंद्रकांत शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे तीन दिवसांपूर्वी विमाननगर परिसरात पीएमपीएल बसमध्ये प्रवास करीत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन गणेश आणि कृष्णाने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरूला होता. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ए. डी. पिंगळे हे आरोपींचा माग काढत होते. त्यावेळी पीएमपीमध्ये चोऱ्या करणारा आरोपी खराडी बायपास चौक येथे थांबल्याची माहिती त्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जाधवला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक मोबाईल आढळून आला. अधिक चौकशीत त्याने गायकवाडच्या मदतीने प्रवाशांचा ऐवज चोरल्याचे कबुली दिली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर खराडी बायपास ते टाटा गार्डन दरम्यान एका व्यक्तीचे पीएमपी प्रवासात 18 हजार 500 रूपये चोरल्याचे समोर आले आहे. या दोघांची चौकशी करण्यात येत असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.