सीएएनंतर केंद्र सरकार लोकसंख्या नियंत्रणाचा कायदाही आणणार- साध्वी निरंजन ज्योती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर आता केंद्र सरकार लोकसंख्या नियंत्रण कायदाही लवकरच आणेल, अशी माहिती केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी मथुरा येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली. यासंदर्भात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणेही झाल्याचे साध्वी यांनी सांगतिले. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती या मथुरेतील चैतन्य विहारचे स्वामी वामदेव ज्योतिर्मठ यांना आदरांजली वाहण्यासाठी उत्तर प्रदेशात आल्या आहेत. रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्यासोबत उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज हेही उपस्थित होते.

केंद्रातील एनडीए सरकार देशहितासाठी आवश्यक ते कायदे आपल्या कारकिर्दीत आणणारच. काश्मिरातील कलम 370 हटवण्याचे धाडस या सरकारने केले आहे. ते कलम रद्द केल्यास काश्मीर खोऱ्यात मोठा रक्तपात होईल अशी भीती व्यक्त होत होती ,पण तसे काही घडले नाही कारण केंद्राने दहशतवादी शक्तींना तोंडच वर काढू दिले नाही ,असेही साध्वी निरंजन ज्योती यांनी मथुरेत सांगितले.