पाटोद्यात बस चालकाला मारहाण; आगाराची बस सेवा ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाटोदा सा वा पाटोदा बस स्थानक प्रवेशद्वारा समोर बस समोर उभ्या असलेल्या तरुणाला बाजूला होण्यास सांगितल्याचा राग धरत माथेफिरू तरुणाने थेट चालकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर या तरुणावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पाटोदा आगाराची बससेवा तब्बल तीन तासाच्यावर ठप्प झाली होती. पाटोदा आगारातील सर्व कर्मचारी पोलीस ठाण्यात आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसले होते. रात्री आठ वाजेपर्यंत परिस्थिती पूर्ववत झाली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा आगाराचे चालक विष्णू नागथाई हे पाटोदा आगाराची परळी- पाटोदा ही बस घेऊन पाटोदा आगारात सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान आले होते. याच वेळी स्थानकाच्या प्रवेश द्वारा समोर मद्यपान केलेले दोन युवक उभे होते. गाडीचा होर्न वाजवल्या नंतरही हे युवक बाजुला न गेल्या मुळे चालक विष्णू नागथाई यांनी त्यांना गाडी आत मध्ये घ्यायची आहे, थोड बाजूला सरकायची विनंती केली. यानंतर या युवकांनी या चालकाशी वाद घालत त्यांना खाली पडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार काही काळ सुरुच होता. त्यानंतर अनेकांनी मध्यस्थी करत वाद मिटवायला हा प्रकर घडल्या नंतर आगारात उपस्थित असलेले सर्व चालक, वाहक, कर्मचारी यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत त्या युवकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी करत ठाण मांडले. तसेच तोपर्यंत आगारातील संपूर्ण बस सेवा ठप्प करण्यात आली. रात्री उशिरा पर्यंत नितीन लक्षमण नागरगोजे रा. येवलवाडी याच्या सह अन्य एक जनावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती