जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये होळीनिमित्त दहशतवाद्यांनी वातावरण बिघडवण्यास सुरूवात केली आहे. कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षादलात चकमक उडाली आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

हिंदुस्थानी जवानांना शोपियांमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. होळीनिमित्त मोठा कट त्यांनी आखला होता असे सांगण्यात आले आहे. सुरक्षाबलाने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तेव्हा उत्तराखातर जवनांनीही त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोन दशतवादी ठार झाले आहेत. तसेच एक दहशतवादी लपला असून त्याचा शोध सुरू आहे.