
शस्त्रास्त्रांची आयात न करता आपण जास्तीत जास्त निर्यात केली पाहिजे, असा मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा उद्देश आहे. पण सध्याच्या घडीला शस्त्रास्त्रांची आयात करणार्या देशांमध्ये हिंदुस्थान जगात दुसर्या स्थानावर आहे, तर जगातील 25 आघाडीच्या शस्त्र निर्यातदार देशांमध्ये आपण 23क्या स्थानी आहोत. मात्र, शस्त्रास्त्र विक्रीच्या जागतिक व्यापारामध्ये 0.2 टक्के इतकाच हिंदुस्थानचा वाटा आहे. म्यानमार, श्रीलंका आणि मॉरिशस हे आपले सर्वात मोठे ग्राहक आहेत.
- ‘स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पीस रिसर्च’ (एसआयपीआर) संस्थेच्या अहकालातून शस्त्रास्त्र आयात-निर्यातीची माहिती समोर आली आहे. 2015 ते 2019 या काळात सौदी अरेबियाने सर्काधिक 12 टक्के शस्त्रास्त्रांची आयात केली. त्याखालोखाल हिंदुस्थान2 टक्क्यांसह दुसर्या स्थानावर आहे.
- चीन3 टक्के शस्त्र आयात करतो. चीन शस्त्र आयातीमध्ये जागतिक पातळीवर पाचव्या स्थानावर असून, शेजारील पाकिस्तान 2.6 टक्के शस्त्र आयात करीत असून, तो 11व्या स्थानावर आहे.
- 2010 ते 2019 या काळात हिंदुस्थानने रशियाकडून सर्काधिक शस्त्रास्त्र विकत घेतली; पण हिंदुस्थानला शस्त्रास्त्र निर्यात करण्याची त्यांची टक्केवारी कमी झाली आहे.
- रशियाखालोखाल हिंदुस्थानला अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांची निर्यात केली जाते. हिंदुस्थानने इस्रायल आणि फ्रान्सकडूनही शस्त्रास्त्रांची आयात मोठ्या प्रमाणात वाढविली आहे.





























































