नगरमध्येही आढळला कोरोनाचा एक रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

नगरमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. दुबईवरून आलेल्या चार जणांची देखबाल सध्या येथील जिल्ह्यामध्ये करण्यात येत असून त्यातील एका जणाला करोनाची लागण झाली असल्याचे अधिकृत या शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. उर्वरित तीन जणांची तब्येत सुधारत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे

एक मार्च रोजी दुबईवरून आलेल्या चार जणांची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांच्यावर देखरेख करण्यात आलेली होती. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी सदर चौघांजणांचे जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी त्यांचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यातील एका जणाला लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.