मोबाईल आला शाळेच्या मदतीला धावून; व्हॉटस्ऍप, ई-लर्निंग ऍपचा प्रभावी वापर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्षातल्या शेवटच्या दोन आठवडय़ांत शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जाणारी अभ्यासाची उजळणी आणि लेखी परीक्षेची पूर्वतयारी अशक्य झाली आहे.

डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान म्हणाले, ‘इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या प्रत्येक तुकडीच्या वर्गशिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉटस्ऍप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुप्सवर विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपत्रिका पाठवण्यात येत आहेत. प्रत्येक विषयाच्या या सराव पत्रिका सोडवून विद्यार्थ्यांनी 1 मार्च रोजी शाळेत घेऊन यायच्या आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची उजळणी होईल, असा विश्वासही प्रधान यांनी व्यक्त केला. विद्यार्थी-पालकांसाठी शाळेने ‘स्कोला ऍप’ तयार केले असून त्याद्वारे सर्व पालकांच्या मोबाईलवर नियमितपणे विषयानुसार गृहपाठ, प्रश्नपेढी आणि सर्वसामान्य सूचना पाठवल्या जात आहेत. पालक मोबाईलवर आमच्या या प्रयत्नांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत असून थेट फोन करून त्यांच्या मनातील शंकाही विचारत आहेत, अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक अंकुश महाडिक यांनी दिली.